रेल्वे मंत्रालय

लोकल प्रवासातील अपघात टाळण्यासाठी मुंबईतील 251 रेल्वे फलाटांची उंची वाढवली

Posted On: 27 NOV 2019 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019

 

रेल्वे मंत्रालयाने फलाट आणि रेल्वे डब्यांच्यातील अंतर कमी करुन अपघात टाळण्यासाठी सर्व श्रेणीतील रेल्वे स्थानका फलाटांची उंची वाढवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रेल्वे पादचारी पूल आणि उंचावलेले फलाट यांच्यासाठी रेल्वेने 2018-19 या आर्थिक वर्षात 6200 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

मुंबई लोकल रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची 760 ते 840 मिलीमीटर वरुन वाढवून 840 ते 920 मिलीमीटर करण्यात आली आहे. यात मध्य रेल्वेच्या 83 फलाटांचा आणि पश्चिम रेल्वेच्या 168 फलाटांची उंची वाढवण्यात आली आहे. यामध्ये सायन, माटुंगा आणि माहीम येथील 4 फलाटांचा समावेश नाही, कारण लोकलच्या पाचव्या-सहाव्या लेनसाठी हे फलाट पाडण्यात येणार आहेत.

ही माहिती रेल्वे, व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

 

 

G.Chippalkatti/D.Rane


(Release ID: 1594027) Visitor Counter : 90
Read this release in: English