अवजड उद्योग मंत्रालय

नू-जेन मोबिलिटी समीट-2019 चे नितीन गडकरींच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 27 NOV 2019 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019

 

रस्ते, वाहतूक, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज हरयाणातील मनेसर इथे नु-जेन मोबिलीटी समीट 2019 या परिषदेचे उद्‌घाटन झाले. ही परिषद इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या संघटनेने आयोजली आहे.

पर्यायी इंधन व्यवस्था आणि ई-दळणवळण या विषयावर ही परिषद आयोजिल्याबद्दल गडकरी यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. जैव-डिझेलमुळे कृषी आणि वाहतूक ही दोन्ही क्षेत्रे आमुलाग्रपणे बदलतील, जीवाश्म इंधनांवरचे अवलंबित्व संपेल आणि अखाद्य तेल बियांची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊ शकेल, असा विचार त्यांनी यावेळेला व्यक्त केला. सरकार वाहन उद्योगाला पुरेसे महत्व देते याबाबत खात्री बाळगावी असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

ही तीन दिवसांची परिषद वाहतूक-वाहने क्षेत्रातील आजवरच सर्वात मोठी परिषद आहे. या 15 देशातील वाहतूक तज्ञ त्यांचे संशोधन निबंध सादर करणार आहेत.

 

 

G.Chippalkatti/D.Rane



(Release ID: 1593882) Visitor Counter : 193


Read this release in: English