कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

निवृत्तीचे वय

Posted On: 27 NOV 2019 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019

 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षांवरुन 58 वर्षे करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत दिली.

1972 आणि 1958च्या कायद्यांनुसार एखादा अधिकारी त्याच्या कार्याशी एकनिष्ठ नसेल अथवा तो त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत नसेल, तर त्याला मुदत संपण्यापूर्वी निवृत्त करण्याचा संपूर्ण अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यासाठी सरकारला या अधिकाऱ्याला 3 महिन्यांची लेखी नोटीस अथवा 3 महिन्यांचे वेतन द्यावे लागेल.

  1. जर अधिकारी श्रेणी अ अथवा ब मधील असेल किंवा त्याचे पद अर्धस्थायी अथवा तात्पूर्त्या स्वरुपाचे असेल आणि 35 वर्षे वयापूर्वी सरकारी नोकरीत रुजू झाला असेल तर त्याच्या वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर
  2. कुठल्याही इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्यांचे वय 55 वर्षे पूर्ण झाल्यानंतर

त्यांना निवृत्ती घेण्यास सांगितले जाऊ शकेल.

 

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1593880) अभ्यागत कक्ष : 111
Read this releasein: English