अंतराळ विभाग
PSLV-C47 प्रक्षेपकावरुन कार्टोसॅट-3 या देशी उपग्रहासह 13 व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Posted On:
27 NOV 2019 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019
भारताच्या पोलार सॅटलाईट लाँच व्हेईकल म्हणजेच PSLV-C47 वरुन आज कार्टोसॅट-3 या देशी बनावटीच्या उपग्रहासह अमेरिकेच्या 13 व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर 17 मिनीट 38 सेकंदांनी कार्टोसॅट-3 हा उपग्रह सन सिन्क्रोनिअस पोलार ऑर्बिट म्हणजे सूर्याच्या समन्वीत कक्षेत स्थिरावला. इतर 13 उपग्रहही त्यांच्या कक्षांमध्ये यशस्वीपणे स्थिरावले.
इस्रोने विकसित केलेल्या उपग्रहांपैकी कार्टोसॅट-3 हा सर्वाधिक गुंतागुंतीचा आणि अत्याधुनिक उपग्रह असून, पृथ्वीवर निरीक्षण करण्यासाठी वापरला जाणार आहे, अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली. या उपग्रहात हाय रिझोलुशन इमेजिंग कपॅबिलिटी म्हणजेच उच्च दर्जाची छायाचित्रण क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.
हा उपग्रह 5 वर्ष अवकाशात राहिल. नागरी भागात नियोजन, ग्रामीण भागातल्या संसाधनांचा शोध पायाभूत सुविधांचा विकास, सागरी किनाऱ्याचा वापर अशा सर्व ठिकाणी या उपग्रहाचा वापर होईल, असे सिवन यांनी सांगितले.

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1593878)
अभ्यागत कक्ष : 110