माहिती आणि प्रसारण मंत्रालय
देशांना नियमांचे बंधन, मात्र कला आणि संगीताला कुठल्याही सीमा नाहीत-के.एम.वेणुगोपाल
‘आनंदी गोपाळ’ ही सत्यघटनेवर आधारलेली प्रेरणादायी कथा-समीर संजय विध्वांस
गोवा, 26 नोव्हेंबर 2019
‘कोलांबी’ या मल्याळम चित्रपटात वयोवृद्ध जोडपे आणि एक युवती यांच्यातल्या नातेसंबंधांवर हृदयस्पर्शी कथानक दाखवण्यात आले आहे. 50 व्या इफ्फीमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. कोलांबी म्हणजे मल्याळी भाषेत ध्वनिक्षेपक. एका सरकारी आदेशानुसार हे ध्वनिक्षेपक बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, त्यावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या एका वृद्ध जोडप्याची त्यामुळे पंचाईत होते. त्यावर हा चित्रपट आधारलेला आहे, असे दिग्दर्शक टी.के.राजीवकुमार यांनी सांगितले. या चित्रपटात कला आणि संगीत यांना विशेष महत्व आहे, असे पटकथा लेखक के.एम.वेणुगोपाल यावेळी म्हणाले. देशांना अनेक नियम आणि बंधनं असतात मात्र कला आणि संगीताला कुठल्याही सीमा नसतात, असे वेणुगोपाल म्हणाले.
‘आनंदी गोपाळ’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर संजय विध्वांस यांनी या चित्रपटाच्या कथानकाविषयी सांगितले. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. 140 वर्ष जुन्या या कथानकात कुटुंबिय आणि समाजाचा विरोध पत्करून गोपाळ जोशी आपल्या पत्नीला म्हणजे आनंदीला अमेरिकेत डॉक्टर बनण्यासाठी पाठवतात, त्याचे प्रभावी चित्रण यात आहे. ही जुनी घटना असली तरी आनंदीबाई जोशींचा प्रवास आजही अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे, असे विध्वांस यांनी सांगितले.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1593854)
Visitor Counter : 100