माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘वास्तवावर आधारीत चित्रपट किती वास्तव’ या विषयावर खुल्या मंचात चर्चा

 

गोवा, 26 नोव्हेंबर 2019

 

इफ्फी 2019 मध्ये आज खुल्या मंचात ‘वास्तवावर आधारीत चित्रपट किती वास्तव’ या विषयावर चर्चा झाली. या चर्चासत्रात चित्रपटकर्ते राहुल रवैल, ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राच्या सहयोगी संपादक अलका सहानी, एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आणि फोटोग्राफीचे संचालक नरेश शर्मा, अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र खंडेलवाल आणि इस्रायलचे चित्रपटकर्ते डॅन वोलमन सहभागी झाले होते.

बायोपिक्स हे माहितीपट असता कामा नयेत, ते डॉक्युड्रामा असले पाहिजेत, असे मत राहुल रवैल यांनी व्यक्त केले. अलका सहानी यांनी कथानकाच्या विश्वसनीतेबद्दल सांगितले. भारताने बिमल रॉय, मृणाल सेन, सत्यजित रे, श्याम बेनेगल यांचे वास्तवदर्शी चित्रपट बघितले आहेत, असे त्या म्हणाल्या.

वास्तवदर्शी चित्रपटात अभिनेत्यांची भूमिका महत्वाची असल्याचे नरेश शर्मा यांनी सांगितले. तर ध्वनी, कॅमेरा आणि इतर तांत्रिक पैलू कुठलाही चित्रपट वास्तवदर्शी ठरत असल्याचे मत देवेंद्र खंडेलवाल यांनी व्यक्त केला.

 

G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1593621) Visitor Counter : 100
Read this release in: English