मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

दुग्ध उत्पादनात 36.35 टक्के वाढ


राष्ट्रीय दुध दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गिरीज सिंह यांनी केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 26 NOV 2019 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2019

 

देशातल्या दुध उत्पादनात 36.35 टक्के वाढ झाली असल्याचे केंद्रीय दुग्धविकास, मत्स्योत्पादन आणि पशुविकास मंत्री गिरीजा सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय दुध दिवसानिमित्त नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2013-14 मध्ये दुग्ध उत्पादनाचे प्रमाण 137.7 दशलक्ष टन होते. 2018-19 मध्ये ते 187.75 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे दुधाच्या दरडोई उपलब्धतेतही वाढ झाली असल्याचे सिंह यांनी सांगितले. 2013-14 मध्ये हे प्रमाण 307 ग्रॅम होते ते 2018-19 मध्ये 394 ग्रॅमवर पोहोचले आहे. दुग्ध उत्पादनाचा वार्षिक विकासदर 2009 ते 2014 या कालावधीत 4.2 टक्के होता. तो 2014-19 या कालावधीत वाढून 6.4 टक्क्यांवर पोहोचला.

आरसेपमध्ये सहभागी होण्यास नकार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 10 कोटी शेतकऱ्यांचे हित जपले आहे, असे सांगून सिंह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

 

 

G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1593601) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English