कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते लोकपालच्या लोगोचे प्रकाशन
लोकपालचे घोषवाक्य “मा गृधः कस्यस्विद्धनम्”चे प्रकाशन
Posted On:
26 NOV 2019 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2019
लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत लोकपालच्या लोगोचे प्रकाशन झाले. सर्व लोकपाल सदस्य यावेळी उपस्थित होते. याचवेळी लोकपालचे घोषवाक्य “मा गृधः कस्यस्विद्धनम्” देखील स्वीकारण्यात आले.
लोकपालच्या लोगो आणि घोषवाक्यासाठी सरकारच्या MyGov पोर्टलच्या माध्यमातून मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी 13 जून 2019 पर्यंत जनतेकडून लोगो आणि घोषवाक्ये मागवण्यात आली होती. लोगोसाठी 2236 डिझाइन्स आली तर घोषवाक्यासाठी 4750 लोकांनी सहभाग घेतला. सर्व वयोगटातल्या लोकांसाठी ही स्पर्धा खुली होती. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथले रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या लोगोच्या चित्राची निवड करण्यात आली.
लोकपाल म्हणजेच लोकांचे पालन करणारा, त्यांची काळजी घेणारा अशा अर्थाला विशद करणारा हा लोगो आहे. कायद्यानुसार जनतेला न्याय देण्यासाठी आणि जनतेचे संरक्षण करण्यासाठी लोकपाल कार्यरत असेल, असा अर्थ यातून स्पष्ट होतो. या चित्रात दर्शवल्याप्रमाणे लोगोच्या मध्यभागी न्यायासन आहे, तर आजूबाजूला मानवी चित्रातून जनता दर्शवली आहे. अशोक चक्रासारख्या आकृतीतून डोळा अर्थात लक्ष दर्शवण्यात आले आहे. केशरी रंगात कायद्याचे पुस्तक आहे आणि दोन हिरव्या हातांनी समतोल दर्शवला आहे. तिरंगी रंगातला हा लोगो राष्ट्रीय लोकपाल दर्शवतो.
स्पर्धेसाठी आलेल्या घोषवाक्यांपैकी एकही घोषवाक्य लोकपालचा उद्देश संपूर्णपणे व्यक्त करणारे आढळले नाही. त्यामुळे लोकपालपीठानेच सर्वसंमतीने ईशावास्योपनिषधाच्या पहिल्या श्लोकातल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. या वाक्याचा अर्थ: मा गृधः= लोभ, करु नका, कस्यस्वित्=कोणाच्याही, धनम्=धनाचा म्हणजेच कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका.
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1593570)
Visitor Counter : 198