माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘उयारे’ ॲसिड हल्ल्यातील पिडीत व्यक्तीची कथा-मनू अशोकन


‘द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्स’: भारतातील उभयचरांवरील पहिला चित्रपट-अजय बेदी

Posted On: 25 NOV 2019 6:25PM by PIB Mumbai

 

गोवा, 25 नोव्हेंबर 2019

 

ॲसिड हल्ल्यातील पीडित व्यक्तींकडे आणि प्रसारमाध्यमांकडून बळी म्हणून पाहिले जाते पण ॲसिड हल्ल्याशी संबंधित चौकटीशी लढा देऊन फिनिक्स पथाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. इफ्फीच्या पॅनोरमा विभागातील ‘उयारे’ या मल्याळम् चित्रपटात ॲसिड हल्ल्यातील पीडित व्यक्तीची अनेक अडचणींवर मात करून पुन्हा उभे राहण्याची कथा मांडण्यात आली आहे. ‘उयारे’ चे दिग्दर्शक मनू अशोकन आणि निर्माते शेंगुआ आणि शेरगा यांनी आज पत्रकार परिषदेत या समकालीन आणि सामाजिकदृष्टया समर्पक चित्रपटाबद्दल सांगितले. ‘द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्स’ या नॉन फिचर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाबद्दल माहिती दिली.

‘उयारे’ हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत असल्याचे मनू अशोकन म्हणाले. विषारी स्वरुपाच्या संपर्क संबंधाचा सामना करणाऱ्या अनेक स्त्रिया आम्ही पाहिल्या होत्या. पल्लवी हे पत्र आणि या पात्राच्या माध्यमातून आम्ही या कथा समाजासमोर मांडल्या आहेत.

याच विषयावर निर्मित होणाऱ्या हिंदी चित्रपटाबद्दल बोलतांना ते म्हणाले की, ‘छपाक’ हा चरित्रपट असून ‘उयारे’ मध्ये खऱ्या आयुष्यातील घटना आणि व्यक्तींपासून स्फूर्ती घेऊन मांडलेली कल्पित कथा आहे. महिलांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल खुलेपणाने बोलायला हवे, असे शेंगुआ आणि शेरगा यांनी सांगितले.

‘द सिकेट लाईफ फ्रॉग्स’ बद्दल बोलताना अजय बेदी यांनी उभयचर प्राण्यांवरील हा पहिलाच भारतीय चित्रपट असल्याचे सांगितले. पश्चिम घाटात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून तो पूर्ण व्हायला तीन वर्ष लागल्याचे ते म्हणाले. आम्ही अनेक जातींचे चित्रीकरण केले पण नामशेष होण्याच्या मार्गावरील 6 ते 7 जाती आम्ही दाखवल्या आहेत. बेडूक शोधणे, मुसळधार पाऊस आदी आव्हानं होती. अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे चित्रीकरण सोपं झाल्याचे त्यांनी सांगितले.

जंगलतोड, बेडकांची शिकार आदींमुळे बेडकांची संख्या कमी होत आहे, असे सांगून बेडूक हा पर्यावरणाचा मापदंड आहेत असे ते म्हणाले. बेडूकांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी अंतिमत: माणसांवर परिणाम करतात असे त्यांनी स्पष्ट केले.

पार्श्वभूमी

‘द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्स’

अजय बेदी, विजय बेदी दिग्दर्शित या चित्रपटात जांभळ्या बेडकांसारख्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या आणि तात्काळ संरक्षण देण्याची गरज असलेल्या प्रजातींची कथा आहे. अजय आणि विनय बेदी  हे द पॉलिसिंग, लंगूर आणि चेरब ऑफ द मिस्ट या चित्रपटांसाठी ग्रीन ऑस्कर पटकावणारे सर्वात तरुण आशियाई आहेत.

उयारे

मनू अशोकन यांच्या या चित्रपटात ॲसिड हल्लाग्रस्त व्यक्ती आणि त्यातून बाहेर पडून कुटुंब आणि मित्रांच्या साथीने स्वप्न साकार करणाऱ्या मुलीची कथा मांडण्यात आली आहे. वैमानिक होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पल्लवी या केरळमधल्या मध्यमवर्गीय मुलीची ही कथा आहे.

गोविंद हा तिच्यावर प्रेम करणाऱ्या पण स्वामित्व गाजवणाऱ्या तरुणाशी वाद झाल्यानंतर ती त्याला सोडून जायचा निर्णय घेते. मात्र सूड उगवण्यासाठी तो पल्लवीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकतो त्यामुळे तिचे स्वप्न भंग होते. ती दिल्लीला भेट देते आणि तिथे ॲसिड हल्ल्यातील बळी काम करत असणारे हॉटेल तिला गवसते. त्यानंतर ती एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन आपले स्वप्न साकार करते.

 

 

G.Chippalkatti/J.Patankar/P.Kor

 



(Release ID: 1593468) Visitor Counter : 130


Read this release in: English