राष्ट्रपती कार्यालय
राज्यपालांची 50वी परिषद राष्ट्रपती भवनात संपन्न
प्रविष्टि तिथि:
24 NOV 2019 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2019
राज्यपालाची 50वी परिषद आज राष्ट्रपती भवनात संपन्न झाली. या दोन दिवसांच्या परिषदेत आदिवासी कल्याण आणि जल, कृषी, उच्च शिक्षण आणि सौकर्याचे जीवन या विषयांवर भर देण्यात आला. या विषयांवर राज्यपालांच्या पाच गटांनी विचार विनिमय करुन तयार केलेले अहवाल आज सादर करण्यात आले. आदिवासी विषयांवरील धोरणे ठरवताना स्थानिक स्थिती लक्षात घेणे गरजेचे असल्याचे मत परिषदेत मांडले गेले.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणात राज्यपाल आणि नायब राज्यपालांनी या परिषदेत केलेला विचार विनिमय फलदायी ठरल्याचे सांगितले. वेगवेगळे विभाग आणि नीती आयोगाने या परिषदेत भाग घेतल्यामुळे कार्यवाहीला योग्य असे निर्णय घेता येऊ शकले, असेही ते म्हणाले.
वासाहतिक काळात गवर्नर हे सामान्य नागरिकांना थारा देत नसत. ही चुकीची पद्धत थांबवून राज्यपालांनी स्वत: जनतेशी संपर्क साधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, सामान्य माणसापासून राजभवन दूरच असते हा समज नाहीसा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
या दोन दिवसीय परिषदेला उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनीही संबोधले.
G.Chippalkatti/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1593371)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English