माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीमध्ये लघुपटांवर दीर्घ चर्चा
गोवा, 23 नोव्हेंबर 2019
50 व्या इफ्फीमध्ये नॉन फिचर फिल्मच्या दोन दिग्दर्शकांनी मिट द प्रेस अंतर्गत पणजी इथे आज संवाद साधला. ‘अ थँकलेस जॉब’चे दिग्दर्शक विकी बर्मेचा, ‘बोहूब्रिता’चे दिग्दर्शक उत्पल दत्त आणि निर्मात्या स्वप्ना दत्त या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या.
कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे काम करुनही प्रशंसा वाट्याला न येणाऱ्या शिक्षकाचा प्रवास आपला लघुपट मांडतो, असे विकी बर्मेचा यांनी सांगितले. मुलांच्या भविष्यासाठी हा शिक्षक खुप काही करतो, शिकवण्याच्या पद्धतीत अनेक प्रयोग करतो, मात्र आजुबाजुचे लोक त्याला मागे खेचतात.
चित्रपटाचा अवधी हा त्याचे कथानक, बजेट आणि निर्माता यानुसार ठरत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

स्वप्ना दत्त यांनी लिहिलेल्या काव्याचे चित्रण म्हणजे आपला चित्रपट असे उत्पल दत्त यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे गद्याचा वापर केला जातो, मात्र आपण काव्याचा वापर केल्याचे ते म्हणाले. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही एक रुपक असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या कवी मनातील प्रतिमा चित्रपटात उभ्या करणे हे कठीण काम असल्याचे स्वप्ना दत्त यांनी सांगितले. आपण चित्रपट क्षेत्राशी निगडित नसल्याचे सांगून यासंदर्भात त्यांनी दिग्दर्शकाची प्रशंसा केली. ‘बोहूब्रिता’ स्वप्ना दत्त यांचे काव्य दृष्यरुपात सादर करणाऱ्या या चित्रपटात आसामची समृद्ध परंपरा वृक्ष नद्या पुजनाची परंपरा पहायला मिळते.
‘अ थँकलेस जॉब’ हा विकी बर्मेचा दिग्दर्शित चित्रपट या कथानकात अतिशय प्रामाणिक शिक्षकाचे आयुष्य आपल्याला पहायला मिळते, ज्याला विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासन यापैकी कोणाकडूनही प्रशंसा मिळत नाही. चौथीच्या वर्गाला पर्यावरण विज्ञान निष्ठेने शिकवणाऱ्या करण या शिक्षकाला निराशेने घेरल्यामुळे तो शिक्षकी पेशा सोडण्याच्या बेतात येतो, मात्र विद्यार्थ्यांकडून त्याला प्रोत्साहन मिळते.
G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1593315)
Visitor Counter : 137