माहिती आणि प्रसारण मंत्रालय

नॉन-फिचर चित्रपटांच्या दिग्दर्शकांचा प्रसारमाध्यमांशी संवाद


लैंगिक अत्याचार वैश्विक सत्य: विभा बक्षी

‘लेटर्स’ मध्ये युद्धभूमीवरील सैनिकांच्या भावना-नितीन सिंघल

‘ममत्व’मध्ये मातृत्वाच्या भावनांची गडद छटा - किर्ती

Posted On: 22 NOV 2019 4:39PM by PIB Mumbai

 

गोवा, 22 नोव्हेंबर 2019

युद्धभूमीवर, बंदुक चालवण्यापेक्षा पत्र वाचणारा सैनिक, स्वत: आई होण्यासाठी विधी करायला तयार असणारी दाई, महिलांच्या हक्कांसाठी लढा देणारे सामान्य पुरुष चित्रपट म्हणजे वैविध्य आणि विरोधाभासाचा शोध 50 व्या इफ्फीमध्ये 3 नॉन फिचर चित्रपटांचे दिग्दर्शक एकत्र आले तेव्हा हा विरोधाभास विशेषत्वाने सामोरा आला. ‘सन राईज’ च्या दिग्दर्शिका विभा बक्षी ‘लेटर्स’चे दिग्दर्शक नितीन सिंघल आणि ‘मानवता’ची दिग्दर्शिका किर्ती या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

‘सन राईज’ या माहितीपटाबद्दल बोलताना विभा बक्षी यांनी लैंगिक अत्याचार हे केवळ हरियाणा वा भारताचाच प्रश्न नसल्याचे सांगितले. हे वैश्विक सत्य आहे असे त्या म्हणाल्या. स्त्री आणि पुरुषांनी या विरुद्ध एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. हरियाणाच्या ज्या भागात महिलांविरुद्धच्या अत्याचाराबाबत आकडेवारी समोर येते, अशा ठिकाणीच आपल्याला महिलांच्या अत्याचाराविरोधातील नायक गवसल्याचे त्या म्हणाल्या. लैगिंक समानता आणि लैंगिक न्याय यात बदल घडवणारे सर्वसामान्य पुरुष आढळल्याचे त्यांनी सांगितले. लैंगिक मुद्यांबाबत मौन सोडणाऱ्या हरयाणातल्या लोकांचे त्यांनी कौतुक केले.

अभिनेता होण्यापूर्वी पत्र वाचून ती ‘लेटर्स’ चित्रपटाची प्रेरणा अभिनेता बनण्याआधी सेन्सॉर करण्याचे काम करणाऱ्या देव आनंद यांच्यापासून मिळाल्याचे दिग्दर्शक नितीन सिंघल म्हणाले. युद्धभूमीवरील सैनिकांच्या भावनांचे प्रतिबिंब या चित्रपटात असल्याचे ते म्हणाले. आपल्या पत्रांमधून आशा जिवंत ठेवणाऱ्या सैनिकांना हा चित्रपट आदरांजली असल्याचे ते म्हणाले. जगभरातील सैनिकांनी प्रत्यक्ष लिहलेल्या पत्रांपासून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फिचर, नॉन-फिचर किंवा मुख्य प्रवाहातील चित्रपट असा भेद न करता चांगली कथा आणि वाईट कथा असा फरक करायला लागले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ममत्व’मागील संकल्पनेबद्दल बोलतांना दिग्दर्शिका किर्ती यांनी या चित्रपटात मातृत्वाच्या भावनेतील गडद छटा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. रिमा या मुख्य व्यक्तीरेखीला समजलेला मातृत्वाचा अर्थ आणि त्याचा प्रवास या चित्रपटात आहे. मातृत्व आणि गर्भावस्था यांच्याविषयी अनेक दंतकथा असल्याचे त्या म्हणाल्या.

लेटर्स – दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटलीत घडणाऱ्या या चित्रपटात ब्रिटीशकालीन भारतातल्या देव पंडित या तरुण सैनिकाबद्दल आहे. त्याच्याकडे बंदूक नाही, ना तो रणगाडा चालवतो वा बॉम्बस्फोट करतो. पत्र वाचणे आणि सेन्सॉर करणे हे त्याचे काम आहे. सैनिकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना लिहिलेल्या पत्रातून आणि या माध्यमातून व्यक्तीरेखांच्या माध्यमातून चित्रपट उलगडत जातो. नितीन सिंघल यांनी यापूर्वी ‘किंडल’ राईस बाअुल आणि राया तसेच एक फिचर फिल्मही दिग्दर्शित केली आहे.

ममता- पूर्व उत्तर प्रदेशात एका गावात कनिष्ठ जातीतील स्त्री दाई/सुईण असते. तिची नणंद मुलाला जन्म देते, तेव्हा स्वत: आई होण्याची इच्छा प्रबळ होते. मातृत्व मिळवण्यासाठी बाकावर  बसून आंघोळ करण्याचा विधी करण्याचे ती ठरवते. ती मुलाला पळवते पण हा विधी करू शकत नाही. ती मुलाला घेऊन परत येते, पण कोणीही तिच्या कथेवर विश्वास ठेवत नाही. कुटुंब बिखरून जाते आणि ते मूल तिच्यापासून वेगळे केले जाते आणि ती दूरवरूनच त्याच्यासाठी अंगाईगीत गाते. या चित्रपटाची दिग्दर्शिका किर्ती बी-टेक असून दिग्दर्शन आणि पटकथालेखन शिकण्यापूर्वी ती बँकेत काम करत होती.

सन राईज- विभा बक्षी दिग्दर्शित या चित्रपटात महिलांचे हक्क आणि लैंगिक समानता यासाठी कार्य करणाऱ्या सामान्य पुरुषांचे असामान्य कार्य दाखवतात, असे आहे. दोन मुलींचे वडील आणि प्रगत विचारसरणी असणारे सरपंच, पुरुष प्रधान स्थानिक राजकारणात महिलांच्या प्रवेशासाठी लढा देणारे, सामूहिक लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीशी लग्न करण्यासाठी समाजाला धुडकावून देणारा अशी पात्रं यात आहेत. हरियाणातील मुलगे आणि मुली यांच्यातील विषम गुणोत्तर प्रमाण यामुळे महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असले तरी सर्व काही संपलेले नाही असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.

विभा बक्षी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया (2015)’ या चित्रपटाला सामाजिक समस्यांवरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

 

G.Chippalkatti/J.Patankar/P.Kor

 


(Release ID: 1593107) Visitor Counter : 140
Read this release in: English