महिला आणि बालविकास मंत्रालय

अंगणवाडी केंद्रांमध्ये भाजीपाला लागवड

Posted On: 22 NOV 2019 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2019

 

देशभरातल्या अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या बालकांना पोषक आहार मिळावा या हेतुने केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना अंगणवाडी परिसरात भाजीपाला लागवड करण्यास प्रोत्साहित केले आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस यांना सरकारतर्फे मानधन दिले जाते. केंद्र सरकारने अलिकडेच या अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ केली आहे. यात त्यांना पोषण अभियान राबवण्यासाठी दर महिना 500 रुपये मानधन दिले जाते. त्याशिवाय अनेक राज्य सरकारे / केंद्र शासित प्रदेशातील सरकारे देखील या अंगणवाडी कार्यकर्त्यांना या व्यतिरिक्त वेगळे मानधन देतात. त्याशिवाय त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षाही प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांना 2000 रुपये तर मदतनीसांना 1000 रुपये केंद्रीय मानधनापेक्षा अधिक दिले जातात.

पोषण अभियानासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या आणि महिला निरीक्षकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. त्यावर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक ॲप विकसित करण्यात आले असून, या ॲपवर अभियानाशी संबंधित सर्व माहिती आणि अद्ययावत आकडेवारी संकलित केलेली असते, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल दिली.

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1593100) Visitor Counter : 108


Read this release in: English