वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एकात्मिक कौशल्य विकास योजना
Posted On:
22 NOV 2019 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2019
वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सर्व हितसंबंधी गटांच्या क्षमता बांधणीसाठी सरकारने ‘समर्थ योजना’ सुरु केली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी 2018 मध्ये सर्व हितसंबंधी गटांची बैठक बोलावण्यात आली होती. त्याशिवाय समर्थ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वस्त्रोद्योग मंत्रालय वेळोवेळी बैठका घेत असते. राज्य सरकारांनाही या योजनेच्या अंमलबजावणीत अंतर्भूत करुन घेण्यात आले आहे.
क्षमता बांधणीसाठीच्या समर्थ योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 राज्य सरकारे यंत्रणा केंद्र सरकारच्या योजनेच्या भागिदार झालेल्या आहेत. या यंत्रणांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत अशी साडेतीन लाख उद्दिष्टे गाठण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी दिली.
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1593082)
Visitor Counter : 96