महिला आणि बालविकास मंत्रालय

अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ

Posted On: 21 NOV 2019 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2019

 

अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस यांना मासिक मानधन दिले जाते. सरकारने प्रमुख अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन मासिक 3000 वरुन 4500 हजार रुपये, छोट्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन 2250 रुपयांवरुन 3500 रुपये, तर अंगणवाडी मदतनीसांचे मानधन मासिक 1500 रुपयांवरुन 2250 रुपयांपर्यंत वाढविले आहे. तसेच कामगिरीनुसार मासिक 250 रुपये प्रोत्साहनपर रक्कम अंगणवाडी मदतनीसांना देण्यात येणार आहे. नवे मानधन दर 1 ऑक्टोबर 2018 पासून ते लागू होतील. अंगणवाडी कार्यकर्त्यांना पोषण अभियानांतर्गत आयसीडीएस-सीएएस वापरल्याबद्दल मासिक 500 रुपये दिले जातात. यात वाढ करण्याचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही.

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1592920) Visitor Counter : 87


Read this release in: English