गृह मंत्रालय

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यापासून दगडफेकीच्या 190 प्रकरणांमध्ये 765 व्यक्तींना अटक

प्रविष्टि तिथि: 19 NOV 2019 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2019

 

जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 हटवल्यापासून आतापर्यंत दगडफेक आणि कायदा व सुव्यवस्थेच्या 190 घटनांमध्ये 765 व्यक्तींना अटक झाली आहे.

गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

काश्मीरमध्ये सुरुवातीच्या काळात शाळांमधली उपस्थिती कमी होती, मात्र ती वाढून परीक्षांच्या काळात 99.7 टक्क्यांवर पोहोचली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांसाठी अलिकडे कोणत्याही विशेष सूचना जारी करण्यात आल्या नसून गेल्या 6 महिन्यात एकूण 34,10,219 पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली आहे. त्यापैकी 12,934 परदेशी पर्यटक होते.

ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेलगत युद्धबंदी करार उल्लंघनाच्या 950 घटना घडल्याची माहिती, आणखी एका संबंधित प्रश्नाला उत्तर देतांना सरकारने दिली.

 

 

G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1592255) आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English