आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पान मसाला बंदी

Posted On: 19 NOV 2019 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2019

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) आकडेवारीनुसार 2016, 2017 आणि 2018 मध्ये तोंडाच्या कर्करोगामुळे अनुक्रमे 34 हजार 668, 37 हजार 212 आणि 39 हजार 951 जण मृत्युमुखी पडले. मात्र हे मृत्यू पान-मसाला खाल्ल्यामुळे झाल्याची स्वतंत्र्य आकडेवारी उपलब्ध नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

एफएसएसएआयने पान मसाल्यावर बंदी घालण्याचे कोणतेही निर्देश दिले नाहीत. मात्र 2011 च्या नियमांनुसार पान मसाल्याचे प्रत्येक पाकिट आणि संबंधित जाहिरातीमध्ये ‘पान मसाला चघहणे हे आरोग्यासाठी घातक’ असल्याची धोक्याची सूचना देणे अनिवार्य असल्याचे या उत्तरात म्हटले आहे.

 

 

G.Chippalkatti/J.Patankar/D.Rane

 


(Release ID: 1592237) Visitor Counter : 114
Read this release in: English