आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘शाश्वत विकास 2030च्या उद्दिष्टांच्या साध्यासाठी वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता’ यावर जागतिक परिषदेचे डॉ.हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2019 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2019
‘शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 साध्य करण्यासाठी वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता’ यावरील जागतिक परिषद 2019 चे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या जागतिक परिषदेतल्या चर्चेचा आणि ज्ञानाच्या आदानप्रदानाचा उपयोग अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी व्हावा, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. चर्चेचे रुपांतर कृतीत व्हावे, यासाठी ज्ञान व इतर स्रोतांच्या आदानप्रदानासाठी आपण यंत्रणा विकसित केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य हा विषय सर्व धोरणात्मक निर्णय आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी आला असल्याचे त्यांनी सांगितले.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1592228)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English