पोलाद मंत्रालय
‘आयएसए – स्टील कॉनक्लेव्ह 2019’चे भारतीय पोलाद संघटनेतर्फे आयोजन
Posted On:
19 NOV 2019 1:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2019
भारतीय पोलाद संघटना, केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या सहकार्याने 21 आणि 22 नोव्हेंबरला ‘आयएसए-स्टील कॉनक्लेव्ह 2019’चे आयोजन करणार आहे. ही या प्रकारची दुसरी परिषद आहे. या परिषदेत पोलाद उद्योगातील भारतातील तसेच जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहोत. तसेच पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्तेही उपस्थित राहतील.
या परिषदेत ‘तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना’ बांधकाम क्षेत्रातील पोलाद उद्योगाची भूमिका पोलाद निर्यात तसेच पर्यावरणीय व्यवस्थापन आदी विषयांवर पोलाद उद्योगातील दिग्गन, सरकारी अधिकारी आणि विशेषज्ञ यांच्यात चर्चा होईल.
यावेळी ‘भारतीय पोलाद उद्योगाची सद्यस्थिती’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन करण्यात येईल तसेच विविध विभागांतर्गत आयएसए पोलाद पुरस्कारही प्रदान करण्यात येतील.
G.Chippalkatti/J.Patankar/D.Rane
(Release ID: 1592135)
Visitor Counter : 93