श्रम आणि रोजगार मंत्रालय

रोजगार कार्यालयांचे अद्ययावतीकरण

Posted On: 18 NOV 2019 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2019

 

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रासह देशात 997 रोजगार कार्यालये अर्थात एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहेत. महाराष्ट्रात 47 रोजगार कार्यालये कार्यरत आहेत. राष्ट्रीय रोजगार सेवेत परिवर्तन घडवण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालय राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे.

प्रकल्पांतर्गत रोजगार सेवांसाठी राज्ये आणि इतर नामांकित संस्थांच्या सहकार्याने आदर्श करिअर केंद्रे उभारण्याची संकल्पना असून, 164 एम्प्लॉयमेंट एक्सचेंजना ही केंद्रे उभारण्याची मान्यता मंत्रालयाने दिली आहे. आदर्श करिअर केंद्र स्थापित करण्यासाठी गेल्या 3 वर्षात आणि चालू वर्षात महाराष्ट्राला 167.25 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, 81.56 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी 21.55 लाख रुपये उपयोगात आणण्यात आले आहेत.

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1592050) Visitor Counter : 86


Read this release in: English