निती आयोग
21 व्या शतकासाठी आरोग्य व्यवस्था बनवण्यासाठीचा आपला अहवाल नीती आयोगाने केला प्रकाशित
Posted On:
18 NOV 2019 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2019
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी आज बिल गेट्स यांच्या उपस्थितीत ‘नव्या भारतासाठी आरोग्य व्यवस्था: अडथळे दूर करणे – सुधारणांसाठी संभाव्य मार्ग’ हा अहवाल प्रकाशित केला.
गेल्या दहा वर्षात भारताचा आरोग्य क्षेत्राच्या प्रवासाद्वारे उच्च दर्जा, देशाच्या न पोहचू शकणाऱ्या गरीब लोकांसाठी परवडण्याजोगी आरोग्य सेवांची तरतूद करण्यात आली आहे.
धोरणकर्ते, निती आयोग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधी तसेच बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारताच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी सुस्पष्ट आराखडा या अहवालात आहे.
अहवालासाठी :-
https://niti.gov.in/sites/default/files/2019-11/NitiAayogBook_compressed.pdf
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1592048)
Visitor Counter : 192