पंतप्रधान कार्यालय

ब्रिक्स व्यापार परिषदेने पुढल्या शिखर परिषदेपर्यंत 500 अब्ज डॉलर्सच्या आंतर-ब्रिक्स व्यापार उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रुपरेषा निश्चित केली-पंतप्रधान


ब्रिक्स देश आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांनी आपत्तीविरोधी संरक्षण उपक्रमात सहभागी होण्याची पंतप्रधानांनी केली विनंती

ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेबरोबर ब्रिक्स नेत्यांच्या चर्चेत पंतप्रधानांचा सहभाग

Posted On: 14 NOV 2019 11:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2019

 

ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेबरोबर ब्रिक्स देशांच्या प्रमुखांच्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.

ब्रिक्स व्यापार परिषदेने पुढल्या शिखर परिषदेपर्यंत 500 अब्ज डॉलर्सचा आंतर-ब्रिक्स व्यापार उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रुपरेषा निश्चित केली असून ब्रिक्स देशांमधील आर्थिक पूरकता महत्वपूर्ण ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. न्यू डेव्हलपमेंट बँक आणि व्यापार परिषद यांच्यातील भागीदारी करार देान्ही संस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी ब्रिक्स देश आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेला आपत्ती विरोधी संरक्षण उपक्रम आघाडीत सहभागी होण्यासाठी विनंती केली. भारतात न्यू विकास बँकेचे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याचे काम लवकर पूर्ण करण्याची विनंती त्यांनी केली. यामुळे प्राधान्य क्षेत्रातील प्रकल्पांना चालना मिळेल, असे ते म्हणाले.

व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संपूर्ण सहकार्याने ब्रिक्स आर्थिक सहकार्य मजबूत करण्यात आपले स्वप्न साकार होऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1591745) Visitor Counter : 109


Read this release in: English