आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सुश्रृषा क्षेत्रात करूणा आणि संयम यांच्या महत्वावर डॉ. हर्ष वर्धन यांचा भर
Posted On:
13 NOV 2019 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2019
परिचारिका व्यवसायतल्या निष्ठा आणि कार्याची प्रशंसा करत सुश्रृषा आणि आरोग्य सेवेतला हा मजबूत आणि महत्वाचा स्तंभ असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
राजकुमारी अमृत कौर परिचारिका महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते आज बोलत होते. वैद्यकीय व्यवसाय हा मानवतेची सेवा करण्याची संधी देणारा व्यवसाय असून, परिचारिका या रुग्णाची प्रत्यक्ष काळजी घेतात. यामध्ये सहानुभूती, करूणा आणि दयाळूपणा यांच्या महत्वावर डॉ. हर्ष वर्धन यांनी भर दिला.
परिचारिकांच्या वर्तणुकीतूनच वैद्यकीय व्यवसायाची मोठ्या प्रमाणात प्रतिमा निर्माण होते असेही ते म्हणाले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1591504)
Visitor Counter : 84