Posted On:
11 NOV 2019 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2019
गुरु नानक देवजी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीच्या पवित्र प्रसंगी नागरिकांना विशेषत: शीख बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. प्रेम, करुणा, समानता आणि सलोख्याची शिकवण गुरु नानक देव यांनी संपूर्ण मानवतेला दिली. ज्ञानाचा प्रकाश फैलावून भेदभाव आणि कर्मकांडापासून मुक्त होण्याची प्रेरणा त्यांनी दिली. मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणाही त्यांनी दिली.
या पवित्र प्रसंगी गुरु नानक देव यांची शिकवण आचरणात आणून त्यांच्या शिकवणीनुसार समानतेवर आधारित समाजाची उभारणी करुया असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar