रसायन आणि खते मंत्रालय

धोरण बदल आणि योग्य समन्वय यांचा मेळ घालत पेट्रो केमिकल उद्योगाच्या सध्याच्या विकासाला अधिक गती देता येईल- डी व्ही सदानंद गौडा

Posted On: 11 NOV 2019 6:58PM by PIB Mumbai

 मुंबई, 11 नोव्हेंबर 2019

 

2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे देशाचे उदिृष्ट साध्य करण्याकरिता उपयुक्त ठरण्याची भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राची लक्षणीय क्षमता आहे असे केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले. भारतातली जागतिक रसायन आणि पेट्रो केमिकल्स उत्पादन केंद्र यावरच्या शिखर परिषद 2019 चे उद्‌घाटन करताना ते आज मुंबईत बोलत होते. या उद्योगाचा भारतात सध्या वेगाने विस्तार होत आहे. धोरण बदल आणि योग्य समन्वय यांचा मेळ घालत याला अधिक गती देता येईल असे ते म्हणाले. यावेळी पेट्रोलियम, खत आणि पेट्रो केमिकल्स गुंतवणूक क्षेत्र पुनरुज्जीवन अभ्यास अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या क्षेत्राचा विकास सध्याचे चित्र आणि पेट्रोलियम, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठीच्या धोरणाचा पथदर्शी आराखडा यावर या अभ्यास अहवालात भर देण्यात आला आहे.

रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाची अद्याप वापरात न आणलेल्या क्षमतेची दखल घेणे गरजेचे आहे. देशाच्या इतर उद्योगाला आकार देण्यात रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग महत्वाची भूमिका बजावतो असे सांगत देशात क्रांती घडवण्याची क्षमता या क्षेत्रामध्ये आहे असे त्यांनी सांगितले.

रसायन आणि खत मंत्रालयाचे सचिव राघवेंद्र राव यावेळी उपस्थित होते. भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग जागतिक उद्योगाच्या तुलनेत अधिक वेगाने विकसित होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फिक्की रसायन उद्योग समितीचे अध्यक्ष दीपक मेहता यावेळी उपस्थित होते.  

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 


(Release ID: 1591337) अभ्यागत कक्ष : 119
Read this releasein: English