गृह मंत्रालय
पश्चिम बंगाल आणि ओदिशातल्या बुलबुल चक्रीवादळानंतरच्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा एनसीएमसीकडून आढावा
प्रविष्टि तिथि:
11 NOV 2019 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2019
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ‘बुलबुल’ या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतरच्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला.
पश्चिम बंगालमध्ये 7 जण मृत्युमुखी पडले असून 1 लाख घरांचे आणि उभ्या पीकांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दूरसंवाद सेवा लवकरच पूर्ववत होईल. ओदिशात 2 लाख हेक्टर वरच्या पीकाचे नुकसान झाले आहे. काही भागांचा अपवाद वगळता वीज आणि पाणी पुरवठा पूर्ववत झाला आहे. ज्या भागात परिस्थिती पूर्ववत झालेली नाही अशा ठिकाणचा पाणी आणि वीज पुरवठाही उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.
अन्नधान्य, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवांसह वीज, दळणवळण सुविधांसाठी केंद्रीय मदतीचे आश्वासन एनसीएमने दिले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1591294)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English