पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

स्वच्छ-निर्मल तट अभियानाला आजपासून सुरुवात

Posted On: 11 NOV 2019 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2019

 

सागरी किनारे स्वच्छ राहावेत, इथली जीवसृष्टी अबाधित रहावी, स्वच्छ किनाऱ्यांप्रती नागरिकांत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने स्वच्छ-निर्मल तट अभियान हाती घेतले आहे.

आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानासाठी 50 किनारे निश्चित करण्यात आले आहेत.

गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश, ओदिशा या दहा किनारी राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले काही किनारे निश्चित करण्यात आले आहेत. या अभियानात शालेय विद्यार्थी/महाविद्यालये, जिल्हा प्रशासन, स्थानिक आणि संबंधित यात सहभागी होत आहेत.

रोज दोन तास किनारा स्वच्छतेचे काम करण्यात येणार आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1591275)
Read this release in: English