पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा संदेश

Posted On: 09 NOV 2019 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांचे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यशाबद्दल दूरध्वनीवरुन अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मॉरिशसच्या जनतेने पंतप्रधान जगन्नाथ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. हा पाठिंबा म्हणजे मॉरिशस सरकारच्या विकासात्मक योजनांना दिलेला पाठिंबा होय. भारताचे मॉरिशसप्रती सहकार्य आणि जवळीक दोन्ही देशांच्या हिताची असल्याचे ते म्हणाले.  

पंतप्रधान जगन्नाथ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि भारतासोबत असलेले खास संबंध पुढे नेऊन परस्पर सहकार्य वृद्धींगत करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी नुकत्याच झालेल्या अप्रवासी दिवस कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या उपस्थितीबद्दल भारत सरकारचे आभार मानले.

पंतप्रधान जगन्नाथ यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारले आणि भारतास लवकरात लवकर भेट देण्याविषयी अनुकूलता दर्शवली.

 


S.Thakur/D.Rane



(Release ID: 1591189) Visitor Counter : 48


Read this release in: English