पंतप्रधान कार्यालय

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवी पहाट घेऊन आला आहे- पंतप्रधान


पंतप्रधान म्हणाले ऐतिहासिक निकाल; भारतीयांना नवीन सुरुवात करुन नव भारत निर्मितीचे आवाहन

Posted On: 09 NOV 2019 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे आणि आजचा दिवस देशाच्या आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील सुवर्णदिन असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना एकत्रित येऊन नव भारत निर्माण करण्याचे आणि प्रत्येकाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज 09 नोव्हेंबर रोजी, कर्तारपूर कॉरिडॉरची सुरुवात झाली. यासाठी भारत आणि पाकिस्तानचे प्रयत्न कारणीभूत आहेत. आणि आता, आजच्या अयोध्याप्रकरणीच्या निकालामुळे, 09 नोव्हेंबर ही तारीख एकत्रित राहण्याची, एकत्रित विकासाची शिकवण देते.” 

पंतप्रधान म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या संयमाने प्रत्येकाची बाजू ऐकून घेतली आणि एकमताने निर्णय दिला.

पंतप्रधान पुढे म्हणाले, “आजच्या निकालाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक संदेश दिला आहे तो म्हणजे कितीही जटील मुद्दे राज्यघटनेच्या चौकटीत आणि कायद्याच्या कक्षेत सोडवले जाऊ शकतात.

आपण या निकालापासून शिकू या की, थोडा विलंब लागेल, आपण संयम राखला पाहिजे. हे सर्वांच्या हिताचे आहे.

प्रत्येक परिस्थितीत, आपला देशाच्या राज्यघटेनवरील विश्वास देशाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास अटळ असला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे.”

पंतप्रधान म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीचा निर्णय दिला आहे आणि हा निर्णय प्रत्येक देशवासियाने राष्ट्र निर्मितीची जबाबदारी अधिक गांभीर्याने घेण्याचा आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सर्वांमध्ये एकोपा, बंधुता, मैत्री, एकता आणि शांतता राष्ट्राच्या विकासासाठी फार महत्वाची आहे. पंतप्रधांनी सर्वांना एकत्र काम करुन उद्दिष्टे साध्य करण्याचे आवाहन केले.    

Narendra Modi@narendramodi

My address to the nation. https://www.pscp.tv/w/cJao1TMyMjExNTJ8MVprSnpBeURCcFJHdnyEYu16xa2uic74bLXAzRSNyGttbJmHGVsVR-TA8zrE …

Narendra Modi @narendramodi

My address to the nation.

pscp.tv

39.9K

4:30 AM - Nov 9, 2019

Twitter Ads info and privacy

13K people are talking about this

 

S.Thakur/D.Rane



(Release ID: 1591188) Visitor Counter : 77


Read this release in: English