ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी केंद्रीय सचिवांना कांद्याचे दर आणि उपलब्धतेबाबत केले अवगत
Posted On:
08 NOV 2019 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2019
ग्राहक व्यवहार विभाग देशातल्या कांद्यांचे दर आणि उपलब्धतेवर सातत्याने बारीक लक्ष ठेऊन आहे. विभागाच्या सचिवांनी उच्च स्तरीय बैठकीत कांद्याच्या सद्य स्थितीबाबत तसेच यासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. काद्यांची उपलब्धता वाढविणे आणि किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पुढील निर्णय घेण्यात आले:-
- देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी दुबई आणि अन्य देशांमधून कांदा आयात करण्याची विनंती एनएमटीसीला करण्यात आली.
- एनएमटीसी, नाफेड आणि कृषी आणि ग्राहक विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथकाला कांदा आयातीसाठी तुर्की आणि इजिप्तचा दौरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- दिल्ली आणि राजस्थान सरकार तसेच एपीएमसींना 9 ते 12 नोव्हेंबरदरम्यान त्यांच्या मंडी खुल्या ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1591065)