गृह मंत्रालय
एससीओ सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांच्या 10 व्या बैठकीत आपत्कालीन स्थिती रोखण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज गृहमंत्र्यांकडून व्यक्त
प्रविष्टि तिथि:
08 NOV 2019 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2019
आपत्कालीन स्थिती रोखण्यासंबंधी एससीओ सदस्य देशांच्या विभागप्रमुखांच्या 10 व्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संबोधित केले. आपत्कालीन स्थितीत कमीत कमी जीवित आणि वित्तहानी व्हावी यासाठी आपत्तीरोधक लवचिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यावर त्यांनी भर दिला. आपत्ती व्यवस्थापनात एससीओ देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी हा उत्तम मंच असल्याचे शहा म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापन हवामान बदलांमुळे नवी आव्हानं निर्माण झाल्याचे ते म्हणाले. आपत्तीपासून लोकांचा जीव वाचवण्यासाठी एकात्मिक आणि समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1590997)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English