मंत्रिमंडळ
भारतातून फेनी नदीतले 1.82 क्युसेक्स पाणी सोडण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
06 NOV 2019 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि बांगलादेशात फेनी नदीसंदर्भात झालेल्या कराराला मंजुरी देण्यात आली. या करारानुसार, भारतातील नदीतून 1.82 क्युसेक्स पाणी सोडले जाणार आहे. भारतातील त्रिपुरा राज्यातल्या सब्रूम गावासाठी यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
लाभ :
सध्या भारत आणि बांगलादेश दरम्यान फेनी जलवाटपासंदर्भात कोणताही करार अस्तित्वात नाही. सध्या सब्रूम गावाला असणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. या करारामुळे गावाला पाणीपुरवठा होईल.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1590768)
Visitor Counter : 95