रेल्वे मंत्रालय
पश्चिम रेल्वेच्या 69 व्या वर्धापन दिनी भारतीय रेल्वेकडून मुंबईकरांना ‘उत्तम रेक’ची भेट
Posted On:
06 NOV 2019 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2019
पश्चिम रेल्वेच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वेने काल ‘अत्याधुनिक उत्तम रेक’ची भेट दिली आहे. चर्चगेट-विरारला जाणाऱ्या महिला विशेष लोकलला काल हा डबा जोडून प्रारंभ करण्यात आला. या उत्तम डब्यांमध्ये सुधारीत अंतर्गत रचना असून मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासाचा विचार करण्यात आला आहे.
उत्तम रेकची ठळक वैशिष्ट्ये
- सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही देखरेख प्रणालीची तरतूद
- चोरी रोखण्यासाठी अँटी-डेंट पार्टीशन
- सामानासाठी मॉड्यूलर रॅक
- प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये हाय बॅकरेस्ट आसनव्यवस्था
- द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये एफआरपी आसन व्यवस्थेची तरतूद
- रुंद हॅण्डल्स तसेच एलईडी दिव्यांची व्यवस्था
- प्रवाशांना सावधानतेचा इशारा देणारी इलेक्ट्रीक प्रणाली
- आपत्कालीन बटनाची सुविधा
हे नवीन डबे आजपासून दररोज रेल्वेच्या 10 फेऱ्या करतील. ऊर्जा बचतीसह या डब्यांमध्ये पश्चिम रेल्वेचा प्रभारी वाहतूक माध्यम म्हणून आजपर्यंतचा प्रवास, मुंबईतील विविध महत्वाची ठिकाणे, प्रेरणादायी विचार आणि यशस्वी महिलांची पोस्टर्स यांचा समावेश आहे.
चेन्नई येथील कोच फॅक्टरी केवळ दोन उत्तम रेकची निर्मिती करण्यात आली असून यातला दुसरा डबा दक्षिण मध्य रेल्वेला देण्यात आला आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1590665)
Visitor Counter : 96