वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सेवा क्षेत्रासाठी ‘ब्रँड इंडिया’ विकसित करावा-पियुष गोयल
सेवा क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेत तीन ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे योगदान
Posted On:
05 NOV 2019 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2019
केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 12 महत्वपूर्ण सेवा क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्रँड इंडिया’ विकसित करण्यात येईल असे सांगितले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय सेवा क्षेत्रातील विविध विभागांना राज्यांच्या भागीदारीच्या माध्यमातून प्रोत्साहन देईल, आणि या विभागांचा विकास आणि विस्तार होऊन हे विभाग भारतीय अर्थव्यवस्थेत अधिक मोलाचे योगदान देतील असेही त्यांनी सांगितले. 5 ट्रिलियन डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था साकार करताना या क्षेत्राचे योगदान 3 ट्रिलियन डॉलर असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या 26 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान बेंगळुरु येथे होणाऱ्या पाचव्या जागतिक सेवा प्रदर्शनच्या पूर्व माहिती देणाऱ्या कार्यक्रमात ते आज नवी दिल्लीत बोलत होते. या प्रदर्शनासाठी उत्तर प्रदेशही भागीदार असणार आहे.
भारतातील सेवा क्षेत्राला संघटित पद्धतीने सामोर ठेवण्यात भारतीय उद्योग महासंघ आणि निर्यात प्रोत्साहन परिषदेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. पर्यटन, आरोग्य सुविधा आणि शिक्षण आदी क्षेत्र गुंतवणुकीला आकर्षित करतील आणि नवीन रोजगारांची निर्मिती होईल असे त्यांनी सांगितले. सेवा क्षेत्रातील प्रचंड क्षमतेचा अद्याप वापर झालेला नसून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची तसेच नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचीही क्षमता आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(Release ID: 1590492)