पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन

Posted On: 05 NOV 2019 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी चार वाजता, पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन करतील. कोलकाता येथे होणाऱ्या  या मेळाव्यात ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करतील.

लोकांमध्ये शास्त्रीय गुणधर्म जागृत करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान  क्षेत्रात भारताचे योगदान दर्शविणे तसेच त्याचे फायदे सर्वसामान्य लोकांना मिळण्यासाठी प्रशासनास  प्रोत्साहित करणे हे महोत्सवाचे मुख्य उद्दीष्ट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी धोरण तयार करण्याचे उद्दीष्ट आहे.

यावर्षी या महोत्सवाची संकल्पना - राइझन इंडिया- संशोधन, नाविन्य आणि विज्ञानद्वारे  राष्ट्र सशक्तीकरण आहे.

 

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1590442) Visitor Counter : 124


Read this release in: English