पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत भेट

Posted On: 04 NOV 2019 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019

 

बँकॉक इथल्या भारत-आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 नोव्हेंबर 2019 रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंधात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. वारंवार होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका आणि सर्व पातळ्यांवरील आदान-प्रदान यामुळे संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची नोंद उभय नेत्यांनी घेतली तसेच भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चारही केला.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील वाढत्या सहकार्याची नोंद घेऊन सागरी क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. दहशतवाद आणि मूलतत्ववादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित काम करण्यावर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी जानेवारी 2020 मध्ये भारताला भेट द्यावी. या निमंत्रणाचा पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1590428) Visitor Counter : 56


Read this release in: English