अर्थ मंत्रालय

केंद्रीय वित्तमंत्री यांच्या हस्ते ‘ICEDASH’ आणि ‘ATITHI’या दोन नवीन माहिती तंत्रज्ञान उपक्रमांचा शुभारंभ

Posted On: 04 NOV 2019 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019

 

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज ICEDASH’ आणि ‘ATITHI’या दोन नवीन माहिती तंत्रज्ञान उपक्रमांचा शुभारंभ झाला. आयात वस्तूंच्या जकातीवर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेत अधिक सुधारणा आणि आयात वस्तूंवरील कस्टम्स कर तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन अधिक सुलभ करण्यासाठी हे दोन नवीन उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत प्रवासी त्यांचे सामान आणि चलनाविषयी अधिक माहिती इलेक्ट्रॉनिक प्रणालीमार्फत घोषित करु  शकतील.

या दोन नवीन माहिती तंत्रज्ञान उपक्रमांमुळे जकात खात्याचे कामकाज अधिक पारदर्शी होईल असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.    

N.Sapre/J.Patankar/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1590320) Visitor Counter : 128


Read this release in: English