पंतप्रधान कार्यालय

बँकॉक मधल्या पूर्व आशिया आणि आरसीईपी शिखर परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी

Posted On: 04 NOV 2019 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बँकॉक इथल्या पूर्व आशिया आणि आरसीईपी शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे, व्हिएतनामचे पंतप्रधान स्कॉट मॉरीझन यांची भेट घेणार आहेत. आज रात्री पंतप्रधान नवी दिल्लीत परततील.

आरसीईपी परिषदेत पंतप्रधान भारताच्या चर्चेचे नेतृत्व करतील. आरसीईपीच्या माध्यमातून 10 आशियान सदस्य देश आणि आशियानचे मुक्त व्यापार करार भागीदार ऑस्‍ट्रेलिया, चीन, भारत, जपान, कोरिया आणि न्यूझीलंड यांच्यात सर्वंकष मुक्त व्यापार करारासंबंधी बोलणी होणार आहे.

आरसीईपी व्यापार करारात सहभागी होण्यासाठी भारत अुनुत्साही असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावली आहे.

सध्या सुरु असलेल्या आरसीईपी चर्चेदरम्यान सर्वंकष आणि समतोल मार्ग काढण्यासाठी भारत कटिबद्ध असला तरी भारताला दोन्ही बाजूंनी विजय हवा आहे असे ‘बँकॉक पोस्ट’ ला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

अशाश्वत व्यापार तुटीबद्दल भारताची चिंता दूर करणे हे महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. सर्वांना सुयोग्‍य लाभ मिळवून देणारी आरसीईपी ही भारत आणि चर्चा करणाऱ्या इतर सर्व भागीदारांची भूमिका असेल, असेही मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.

2012 मध्ये कंबोडियात सुरु झालेल्या आरसीईपी चर्चेमध्ये व्यापार, सेवा, गुंतवणूक, बाजारपेठ उपलब्धता, आर्थिक सहकार्य, ई-कॉमर्स आदींचा समावेश आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar



(Release ID: 1590259) Visitor Counter : 128


Read this release in: English