पंतप्रधान कार्यालय
हवाई दल प्रमुखांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान झाले सहभागी
Posted On:
09 OCT 2019 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2019
हवाई दलप्रमुखांनी नवी दिल्लीतल्या ‘एअर हाऊस’ येथे आयोजित केलेल्या ‘ॲट होम’ स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी यावेळी ‘आयएएफ इनोव्हेशन डिस्प्ले’ या प्रदर्शनाला भेट दिली. नावीन्यपूर्ण शोध आणि स्वदेशीकरणाच्या माध्यमातून स्वयंपूर्णता ही या प्रदर्शनाची संकल्पना होती.
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जुन सिंह यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरणही पंतप्रधानांनी केले.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1589908)
अभ्यागत कक्ष : 74