गृह मंत्रालय

लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून राधा कृष्ण माथुर यांनी घेतली शपथ

प्रविष्टि तिथि: 31 OCT 2019 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2019

 

लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून राधा कृष्ण माथुर यांनी एका साध्या परंतु ऐतिहासिक समारंभात शपथ घेतली. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी माथुर यांना पदाची शपथ दिली. त्रिपुराचे मुख्य सचिव आणि संरक्षण सचिव म्हणून दुर्गम आणि सीमावर्ती भागात केलेल्या कामाचा अनुभव आपल्या उपयोगात येईल असे माथुर यांनी यानंतर बोलताना सांगितले.

शपथविधीनंतर लडाख पोलिसांनी माथुर यांना मानवंदना दिली. लेह आणि कारगील हिल कॉउन्सिल, लष्करी आणि निमलष्करी दल, धार्मिक नेते या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1589755) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English