पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

बीपीसीएलमध्ये सतर्कता सप्ताह 2019 चे उद्‌घाटन

Posted On: 30 OCT 2019 7:01PM by PIB Mumbai

 

मुंबई, 30 ऑक्टोबर 2019

 

बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयात 30 ऑक्टोबरला दक्षता सप्ताह 2019 चे बीपीसीएलचे मुख्य सतर्कता अधिकारी सुनील जैन आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या हस्ते संयुक्तरित्या उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांसह सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाची शपथ घेतली.  

पालकांच्या प्रामाणिकपणाच्या कृतीतूनच मुलांना प्रामाणिकपणाचा पहिला धडा मिळतो. नियम आणि पद्धतींचे सुलभीकरण, पारदर्शकता आणि जनतेचे सबलीकरण, गुन्हेगारांना परिणामकारक शिक्षा या तीन मार्गांनी भ्रष्टाचाराला आळा बसतो असे डी. शिवानंदन यांनी बीज भाषणात सांगितले.

सुनील जैन यांनी उद्‌घाटनपर भाषणात सतर्कता सप्ताहाचा उद्देश विषद केला. प्रामाणिकपणा हीच जीवनशैली या तत्वाचा अंगीकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कटिबदृध राहण्यावर त्यांनी भर दिला.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1589649) अभ्यागत कक्ष : 93
Read this releasein: English