पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे यांची रियाध येथे भेट

Posted On: 29 OCT 2019 11:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाच्या रियाध येथे फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह (एफआयआय) बैठकीच्या दरम्यान जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी यावेळी विचारविमर्श केला. जॉर्डनच्या राजाच्या गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार आणि करारांवरही यावेळी चर्चा झाली. मध्य पूर्व शांतता प्रक्रिया आणि इतर प्रादेशिक घडामोडींवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या सहकार्याबाबतही दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला.

भारत आणि जॉर्डन दरम्यान प्राचीन काळापासून ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंध आणि नागरिकांमधला संपर्क राहिला आहे. पंतप्रधानांच्या जॉर्डन दौऱ्यामुळे आणि जॉर्डनच्या राजांनी 2018 मध्ये दिलेल्या भारत भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली आहे. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि बहुपक्षीय मुद्यांवर परस्पर सन्मान आणि समन्वयातून हे प्रतीत होत आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1589638) Visitor Counter : 97


Read this release in: English