गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

संसद भवन, केंद्रीय सचिवालय आणि सेंट्रल व्हिस्टाचा विकास आणि पुनर्निर्माणाची अंतिम मुदत निश्चित


सेंट्रल व्हिस्टाचे काम नोव्हेंबर 2021 पर्यंत, संसद भवनाचे काम मार्च 2022 पर्यंत, तर केंद्रीय सचिवालयाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावे लागेल

Posted On: 25 OCT 2019 6:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2019

 

केंद्र सरकारने संसद भवन, केंद्रीय सचिवालय आणि सेंट्रल व्हिस्टाचा विकास आणि पुनर्निर्माणाची अंतिम मुदत निश्चित केली आहे. त्यानुसार सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम नोव्हेंबर 2021 पर्यंत, संसद भवनाचे काम मार्च 2022 पर्यंत तर केंद्रीय सचिवालयाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करायचे आहे.

केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारचे नियम आणि आवश्यकतेनुसार कंपनीला निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करायचे आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1589247) Visitor Counter : 213


Read this release in: English