माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 250 चित्रपट दाखवले जाणार
सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 250 चित्रपट दाखवले जाणार
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2019
50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये 76 देशातले 200 सर्वोत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात 26 चित्रपट, 15 कथाबाह्य चित्रपट दाखविण्यात येणार असून या सुवर्ण महोत्सवी इफ्फीमध्ये 10 हजार चित्रपट रसिक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली.
इफ्फीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून 2019 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले विविध भाषांमधले 12 प्रसिद्ध चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान दाखवले जातील.
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त अमिताभ बच्चन यांचे मनोरंजनात्मक चित्रपट या इफ्फीमध्ये दाखवण्यात येणार असून अमिताभ बच्चन यांच्या सिनेक्षेत्रातल्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे.
इंडियन पॅनोरमा हा इफ्फीचा महत्वाचा भाग आहे. यामध्ये सर्वश्रेष्ठ समकालीन भारतीय चित्रपट आणि कथाबाह्य चित्रपट दाखवले जातात. यावर्षी चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली फिचर फिल्म ड्यूटी असून इंडियन पॅनोरमा 2019 साठी हेलारो या गुजराती चित्रपट उद्घाटनासाठी निवड करण्यात आली आहे. अभिषेक शाह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
कथाबाह्य चित्रपटांच्या ज्युरीचे प्रसिद्ध माहितीपट निर्माते राजेंद्र जांगले अध्यक्ष आहेत. ज्युरींनी इंडियन पॅनोरमा 2019 च्या कथाबाह्य चित्रपटाचे उद्घाटन करण्यासाठी आशिष पांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या नूरेह चित्रपटाची निवड केली आहे.
चित्रपट आणि कथाबाह्य चित्रपटांची सूची.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1588854)
Visitor Counter : 158