आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘इट राईट इंडिया’ अभियान बळकट करण्यासाठी फुड सेफ्टी मित्र योजनेचे डॉ. हर्षवर्धन यांनी केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2019 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2019
सामाजिक आणि वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग्य आहार घेण्यासंदर्भातले ‘इट राईट इंडिया’ अभियान महत्वपूर्ण असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. जागतिक अन्न दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी फूड सेफ्टी मित्र योजनेचे उद्घाटन त्यांनी केले. अन्नाची नासाडी टाळावी, कमी आहार, योग्य आहार आणि आरोग्यदायी आहार हा गांधीजींचा संदेश जनतेने आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
अन्न सुरक्षाविषयक कायद्यांचे पालन, स्वच्छता निकष, प्रशिक्षण, परवाना, नोंदणी यासारख्या बाबींमधे फूड सेफ्टी मित्र, लहान आणि मध्यम खाद्यान्न व्यावसायिकांना मदत करतील.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1588307)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English