उपराष्ट्रपती कार्यालय

जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे सीमापार दहशतवादाला आळा बसेल आणि समावेशक विकासाला चालना मिळेल- उपराष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 14 OCT 2019 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2019

 

जम्मू काश्मीरची पुनर्रचना करुन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळून सीमापार दहशतवादाला आळा बसेल असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सियरा लियोनची राजधानी फ्रीटाऊन येथे भारतीय समुदायाला ते संबोधित करत होते. भारताचा एक शेजारी, दहशतवादी कारवायांना खतपाणी घालून, त्यासाठी पैसा पुरवून त्रास निर्माण करत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये हजारो लोक मारली गेली आहेत. दहशतवादाला धर्म नसतो असे सांगून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्राला एकाकी ठेवण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1588041) आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English