पंतप्रधान कार्यालय

आयुष्मान भारतमुळे दुर्गम बेटावरील रहिवाशाचे आयुष्य झाले पुन्हा पूर्ववत


रतन बराई आता आरोग्यदायी आयुष्य जगत आहे

Posted On: 01 OCT 2019 9:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2019

 

अंदमान आणि निकोबार बेटावरील 52 वर्षीय रतन बराई हा गरीब कुटुंबातील असून हृदय विकारामुळे ग्रस्त होता.

त्याला छातीच्या डाव्या भागात दुखू लागल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर घाम आल्यामुळे पोर्ट ब्लेअर येथील जी. बी. पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला मधुमेहाचाही त्रास होता. संपूर्ण तपासानंतर त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचे निदान झाले. औषधोपचाराने त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली आणि पुढील उपचारांसाठी त्याला मुख्य भूमीवरील हृदय विकार तज्ञांकडे पाठवण्यात आले.

अंदमान आणि निकोबार बेटांवर हृदयाच्या विकासरांसाठी औषधोपचार उपलब्ध नसल्याने अशा सर्व रुग्णांना कोलकाता आणि चेन्नईसारख्या शहरात जावे लागते.

रतन बराईकडे पुरेसा पैसा नसल्याने त्याच्यासाठी हे अवघड होते.

मात्र आयुष्मान भारत PM-JAY अंतर्गत रोकडरहित विमा सुरक्षा मिळते हे समजल्यानंतर त्याच्या आयुष्यात आशेचा नवा किरण आला. या योजनेच्या मदतीमुळे त्याला आवश्यक ते औषधोपचार मोफत मिळाले.

आज तो निरोगी असून पंतप्रधानांना जगातल्या सर्वाधिक मोठ्या (10.74 कोटी लाभार्थी) आरोग्य योजनेच्या यशोगाथा सांगणाऱ्या 31 जणांमध्ये त्याचा समावेश होता.

गेल्या वर्षभरात रतन बराईसारख्या 50 हजारांहून अधिक रुग्णांना त्यांच्या राज्याबाहेरील आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 16 हजार 85 हॉस्पिटलचा समावेश असून आतापर्यंत 41 लाख लाभार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून 10 कोटींहून अधिक ई-कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

आयुष्मान भारत अंतर्गत देशभरात 20 हजार 700 हून अधिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.

 

M.Chopade/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1587135) Visitor Counter : 75


Read this release in: English