गृह मंत्रालय

नवी दिल्ली-कटरादरम्यान धावणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या ‘वंदे-भारत एक्सप्रेस’ला अमित शहांनी दाखवला हिरवा झेंडा

प्रविष्टि तिथि: 03 OCT 2019 3:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2019

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली-कटरा दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे-भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या फेब्रुवारीत उद्‌घाटन केलेल्या नवी दिल्ली-वाराणसी अर्धजलद गाडीनंतरची ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे. या गाडीचे डबे चेन्नई रेल्वे कारखान्यातील स्वदेशी बनावटीचे आहेत.

या नवरात्रीत रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या या मोठ्या भेटीबद्दल अमित शहा यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. जम्मू काश्मीरच्या विकासात धार्मिक पर्यटनाचा मोठा वाटा असल्याचे शहा यांनी सांगितले.

5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वे महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे, असे सांगून ‘वंदे-भारत एक्सप्रेस’ म्हणजे ‘मेक इन इंडिया’चे मोठे यश असून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता या रेल्वेगाडीत असल्याचे शहा म्हणाले.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतांना शहा म्हणाले की, मोठ्यात मोठ्या प्रश्नाचे साधे आणि सोपे उत्तर कसे शोधता येईल हे तत्त्वज्ञान गांधीजींनी जगाला दिले. वंदे-भारत रेल्वेगाडी ही पूर्णत: स्वदेशी असून जगातल्या कुठल्याही आधुनिक रेल्वेप्रमाणेच आहे, असे ते म्हणाले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1587071) आगंतुक पटल : 85
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English