अर्थ मंत्रालय
सप्टेंबर 2019 मधील जीएसटी महसूल जमा
सप्टेंबर 2019 मध्ये एकूण 91,916 कोटी रुपयांचा महसूल जमा
Posted On:
01 OCT 2019 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2019
सप्टेंबर 2019 मध्ये जीएसटी महसूलाद्वारे एकूण 91 हजार 916 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. या महसूलापैकी 16 हजार 630 कोटी केंद्रीय जीएसटी, 22 हजार 598 कोटी राज्यांचा जीएसटी, 45 हजार 69 कोटी आंतरराष्ट्रीय जीएसटी आणि 7,620 कोटी रुपये सेस अधिभाराद्वारे जमा झाले. ऑगस्ट महिन्यासाठी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत दाखल केलेल्या जीएसटीआर 3 बी परताव्याची रक्कम 75.94 लाख रुपये आहे.
सरकारने केंद्रीय जीएसटीचे 21 हजार 131 कोटी आणि राज्यांच्या जीएसटीचे 15 हजार 121 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले.
सप्टेंबर 2018 च्या तुलनेत सप्टेंबर 2019 मध्ये जमा झालेल्या महसूलात 2.67 टक्के घट झाली.
M.Chopade/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1586868)
Visitor Counter : 119