संरक्षण मंत्रालय
ब्राम्होस या क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2019 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2019
ब्राम्होस या स्वनातीत क्रुझ क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रासाठी स्वदेशी सामग्रीचा वापर झाल्यामुळे संरक्षण क्षमता वृद्धींगत झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या चमुचे आणि संबंधितांचे अभिनंदन केले.
भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ब्राम्होस विकसित केले आहे.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1586730)
आगंतुक पटल : 316
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English